जालना- आपले पाय खेचणाऱ्या विचारांचा आपल्यावर प्रभाव होऊ देऊ नका, असे विचार दूर ठेवण्यासाठी आपल्या ब्रेनला ट्रेंड करा ,असे आवाहन छत्रपती संभाजी नगर येथील महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरनच्या सहआयुक्त अंजली धानोरकर यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जालना शहरात एक अनोखा उपक्रम चालू आहे. तो म्हणजे जिल्ह्यातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी असूनही आर्थिक दुर्बल असल्यामुळे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्याकडून योग्य त्या नियम अटींची तपासणी करून शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा. जालना एज्युकेशन फाउंडेशन(JEF) ही संस्था अशा अशा विद्यार्थ्यांची निवड करते आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च कलश सीड्स(kalash seeds) ही बियाणे उत्पादन कंपनी करते .अशा दोन्हीचा संगम घालून हा उपक्रम चालू आहे. सन 2021 -22 पासून आतापर्यंत 1158 विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप श्रीमती धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या . व्यासपीठावर एकलव्य इंडिया फाउंडेशन नागपूरचे संस्थापक राजू केंद्रे, कलश सीड्स चे कार्यकारी संचालक सुरेश अग्रवाल ,सौ. वर्षा अग्रवाल जालना एज्युकेशन फाउंडेशन चे सुरेश लाहोटी, सुनील रायठा, सुरेश केसापूरकर, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना अंजली धानोरकर म्हणाल्या, की समाजाचा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर विश्वास नसला तरी आपला स्वतःचा विश्वास आपल्यावर ठेवा आणि असा विश्वास ज्यावेळी ठेवाल त्यावेळी तुम्ही नक्की यश मिळवलेले असेल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातील नामवंत उद्योजक ,शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, व्यापारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,9422219172
