जालना- महाविद्यालयात शिकत असलेल्या अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीला बळजबरीने धमकावून, प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला बुरखा घालायला लावून आपल्या घरी नेऊन  बलात्कार केल्याची घटना बुधवार दिनांक 15 रोजी उघडकस आली. या संदर्भात विद्यार्थिनीने  कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. 

डिसेंबर 2025 मध्ये या दोघांची महाविद्यालयात ओळख झाली. त्यानंतर साहिल अशरफ अन्सारी राहणार, मिलत नगर जुना जालना याने या विद्यार्थिनी सोबत जवळीक साधण्यचा प्रयत्न केला. परंतु तिने याचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यावेळेस साहिलने ,”तू जर प्रेमाला होकार दिला नाहीस तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. या भीतीमुळे विद्यार्थिनीने होकार दिला आणि पुढे हा प्रवास सुरू झाला. साहिल या आंतरधर्मीय विद्यार्थिनीला बाहेर फिरायला घेऊन जायचा आणि त्यावेळेस बुरखा घालायला लावायचा. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. पंधरा तारखेला साहिलने या विद्यार्थिनीला आपल्या घरी कोणी नाही घरी गप्पा मारत बसू असे म्हणून महाविद्यालयासमोर बुरखा घालायला लावला आणि मोटरसायकल वर बसून मिल्लत नगर येथे असलेल्या घरी नेले.  एका दोन मजली इमारतीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत तो राहत होता .तिथे त्याने या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केला. विद्यार्थिनींने विरोध केला मात्र त्याला त्याने जुमानले नाही आणि आपण लग्न करू असे आमिष दाखवले. परंतु काही वेळाने साहिल ने रंग बदलले आणि आपली फसवणूक झाल्याची विद्यार्थिनीला जाणीव झाली. त्यामुळे तिने हा घडलेला प्रकार आईला सांगितला आणि दिनांक 15 रोजी रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि बलात्काराचा गुन्हा साहिल  अन्सारी यांचविरुद्ध नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता दिनांक वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version