जालना- मोतीराम अग्रवाल मर्चंट कॉपरेटिव बँकेला बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 कोटींचा गंडा घालणाऱ्या रायचंद कुरंगळ याने मुख्य कार्यालय बीड असलेल्या पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या जालना शाखेला देखील आठ कोटींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कडीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .रायचंद कुरंगळ याला हा घोटाळा करण्यासाठी मदत केल्याचा ठपका शाखेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांच्यावरही ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने रायचंद कुरंग आणि शिरीष देवळे या दोघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

गोदामा मध्ये असलेल्या धान्याच्या पावतीवर कर्ज देण्याची सुविधा पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेने सुरू केली होती. त्या अनुषंगाने आत्तापर्यंत 23 कर्जदारांना सुमारे दहा कोटींचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी दोन कोटी वसूलही झाले आहेत. दरम्यानच्या काळात रायचंद कुरंगळ याने जालना मर्चंट बँकेला बनावट ग्राहक आणि बनावट कागदपत्रे तयार करून 23 कोटी रुपयांचा गंडा घातला. त्या प्रकरणानंतर अशा प्रकारच्या कर्जवाटप करणाऱ्या बँकांचे धाबे दणाणले .त्यामुळे पूर्णवादी बँकेने देखील अशा प्रकारचे कर्ज वाटप झालेल्या गोदामातील धान्याची तपासणी करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष जोशी यांनी जालना शाखेचा आढावा घेतला असता इथेही काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. दिनांक 14 रोजी ज्या धान्यावर कर्ज दिले होते ती गोदामे तपासून माल संरक्षित करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी शाखा व्यवस्थापकाला दिल्या. तसेच पत्र त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला ही दिले होते. त्या अनुषंगाने शिरीष देवळे यांनी दिनांक 14 रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी रायचंद कुरंगळ याच्यासोबत सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी जिओ टॅग चे फोटो काढून वरिष्ठांना पाठवले. त्यानंतर गोदामातील हा माल गायब झाला आहे. दरम्यान 16 तारखेला रायचंद कुरंगळयाला या प्रकरणाचा तपास करत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सध्या तो या पोलिसांच्या ताब्यात आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पूर्णवादी बँकेने गोदामाची तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. रायचंदला कर्ज मिळवून देण्यासाठी योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून न घेणे ,मालाची वेळच्यावेळी तपासणी न करणे आणि बँकेने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून रायचंद ला मदत करणे अशा वेगवेगळ्या आरोपांवरून शिरीष देवळे यांच्यावरही हा गुन्हा रात्री दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172