जालना- जालना शहर ,जिल्हा, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशाचे अग्रवाल समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी जालन्याला मिळाली आहे. अशा प्रकारचे राष्ट्रीय नेतृत्व जालन्याला मिळाल्यामुळे निश्चितच जालन्याचे नाव देखील भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. हे नाव पोहोचविण्याचे काम जालन्यातील स्टीलउद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित असलेल्या कालिका स्टीलचे संचालक घनश्यामदास गोयल यांची निवड झाली आहे.

अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी श्री. गोयल यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा अग्रवाल संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत मित्तल आणि महासचिव गोपाल गोयल यांनी केली. भारतामध्ये सुमारे चार कोटी एवढी मोठी लोकसंख्या या अग्रवाल समाजाची आहे. जालना शहराचा विचार केला तर सुमारे हजार घरे आणि 5000 लोकसंख्या या समाजाची आहे. इतर समाजाच्या तुलनेत जरी ही लोकसंख्या कमी वाटत असली तरीही उद्योगात मात्र हा समाज सर्वात पुढे आहे. विशेष करून स्टील उद्योगात. या उद्योगात सुमारे 75 ते 80 टक्के याच समाजाचे वर्चस्व आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवेमध्ये देखील आता या समाजाचे उच्च सदस्य अधिकारी जबाबदारी निभावतांना दिसत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ व्यावसायिक आणि व्यापारी म्हणून असलेल्या या समाजाने आता प्रशासनाच्या उच्च पदांवर देखील शिक्का मोर्तब केले आहे.


या नियुक्ती संदर्भात बोलताना घनश्यामदास गोयल म्हणाले की, “यापूर्वी देखील सर्वच समाजासाठी आपण काम केलेले आहे, आणि करत आहोत परंतु आता ही राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी दिल्यामुळे निश्चितच या समाजाच्या विकासासाठी भर द्यावा लागणार आहे. हा समाज बहुतांश उद्योजक ,व्यापारी आहे. त्यामुळे या समाजाची उन्नती झाली की आपोआपच इतर समाजाची देखील प्रगती आणि भरभराट होईल. त्या समाजाला देखील रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे”

सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
