जालना-  अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात मागील एक आठवड्या पासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. बहरात असलेल्या बाजरी,सोयाबीन, तूर व कपाशी पिके पिवळी पडू लागली आहेत.या संततधार पावसाच्या संकटामुळे बळीराजा पुन्हा धास्तावला आहे.
               वडीगोद्री मंडळात गेल्या ६ दिवसात २५६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.त्यामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले आहे.परिसरात सोमवारी १४३ मिमी जोरदार मुसळधार पाऊस पडला.मुसळधार पडलेल्या या पावसाने शेत ,शिवारात चहूकडे पाणीच पाणी वाहू लागले. सतत रोजच्या पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन व कपाशी सह अनेक पिकांचे तसेच डाळिंब व मोसंबी फळबागांची फळगळ होऊन नुकसान होत आहे.काढणीस आलेल्या मुगाला आता अंकुर फुटू लागले आहेत.फळबागांचा जिल्ह्या म्हणून जालन्याची ओळख आहे.मोसंबी,डाळिंब,द्राक्ष आदी फळपिकांचे ही अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे मोसंबी व डाळिंब फळांची मोठ्याप्रमाणात फळगळ झाली आहे.तसेच ढगाळ वातावरणामुळे अनेक रोगांनी या फळबागांवर ताबा मिळविला आहे.
वडीगोद्री महसूल मंडळात पडलेला पाऊस

१६ ऑगस्ट – १४३ मिलिमीटर,१७ ऑगस्ट – ०८ मिलिमीटर,१८ ऑगस्ट – ४२ मिलिमीटर,१९ ऑगस्ट – ३० मिलिमीटर,२१ ऑगस्ट – ३३ मिलिमीटर

https://play.google.com/store/apps/details?id=com.edtv.jalnana.com
www. edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version