जालना -मागील दहा दिवसांमध्ये बांगलादेशात इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली, दुर्गा देवीचा सभामंडपही जाळण्यात आला. या जाळपोळी मध्ये इस्कॉनच्या तीन भक्तांची ही हत्या झाली. बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्याला प्रतिबंध करावा या मागणीसाठी शनिवार दिनांक 23 रोजी “इस्कॉन”( आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) च्या वतीने अंबड चौफुली येथे वैश्विक संकीर्तन करून िल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

वैश्विक कीर्तनाच्या या कार्यक्रमासाठी विविध हिंदू संघटना येणार आहेत. बांगलादेशात तेरा शहरांमध्ये 101 इस्कॉनच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आले ,आणि 180 हिंदूंची दुकाने फोडण्यात आली. या घटनेसंदर्भात भारत सरकारने बांगलादेशाला समज द्यावी यासाठी उद्याचे हे आंदोलन असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे इस्कॉनचे व्यवस्थापक दास गोविंददास यांनी दिली आहे. सकाळी दहा वाजता अंबड चौफुली येथून वैश्विक कीर्तन करत हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील आणि त्यांना निवेदन देतील.
-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version