जालना- covid-19 चा काळ आता हळूहळू संपायला लागला आहे आणि नोकऱ्या मिळण्याचे दिवस यायला लागले आहेत. तरुणांना कामधंदे ही मिळायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 100 विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली आहे.
जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहून उद्योगधंदे कसे सुरू करायचे याविषयी प्रशिक्षण दिल्या जाते. व्यावसायिक अभ्यासक्रमावर इथे जास्त भर दिला जातो. त्यानिमित्ताने नोकरी देखील उपलब्ध होते. काल दिनांक 24 रोजी रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी एन. बी. वाघमोडे यांनी या संस्थेत येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीसाठी दोनशे विद्यार्थी आले होते. मात्र 100 विद्यार्थी कंपनीच्या निकषांतसाठी पात्र ठरले. या शंभर विद्यार्थ्यांना कंपनीने प्रशिक्षणासाठी बोलावले आहे.
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app