Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » ऊस तोडी साठी मध्यस्थी करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे अपहरण
    Jalna District

    ऊस तोडी साठी मध्यस्थी करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे अपहरण

    EdTvBy EdTvFebruary 8, 2022No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- ऊस तोडी साठी कोयते (मजूर)मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण येथील नामदेव खंडुजी कडपे,वय 60 यांच्या मुलाचे चार गुत्तेदारांनी अपहरण केल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली.

    दरम्यान या मुलाचा ठावठिकाणा माहीत असतानाही पोलीस शोध घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप नामदेव कडपे यांनी केला आहे, तर ज्या ठिकाणी मुलगा असल्याचा सुगावा लागला होता ते ठिकाण परराज्यात आहे आणि तेथे पोलिसांचे पथक जाऊन आले आहे. मात्र तो भेटला नाही त्यासोबत आरोपी हे माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे आहेत आणि तिथेही पथक जाऊन आले मात्र घराला कुलुप असल्याची माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागरे यांनी दिली आहे.

    रायगव्हाण येथील शेतकरी नामदेव खंडुजी कडपे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्या ओळखीचे शेख मेहबूब शेख गुलाब हे त्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये भेटले होते आणि ऊस तोडी साठी काही मजूर मिळतील का याची चौकशी केली होती. त्यानंतर नामदेव कडपे यांनी ऊसतोड मजुरांचा शोध घेऊन त्यांच्या ओळखीचे कीनोद मुरलीधर आडे, यांची भेट घालून दिली. त्यानंतर आडे आणि शेख मेहबूब यांच्यामध्ये ऊस तोडी चा करार झाला. या करारावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार चोवीस कोयते ऊसतोडीसाठी देण्याचे ठरले आणि त्या बदल्यात चोवीस लाखांचा व्यवहार झाला. परंतु प्रत्यक्षात नामदेव कडपे यांचा आर्थिक व्यवहाराशी काहीही संबंध नाही. प्रत्यक्षात विनोद आडे यांनी फक्त सातच कोयते ऊसतोडीसाठी पाठवले. त्यामुळे शेख मेहबूब शेख गुलाब यांनी पुन्हा नामदेव कडपे यांच्याकडे विचारणा सुरू केली. या व्यवहारात आपला संबंध नाही असे म्हणून नामदेव कडपे यांनी विनोद आडे यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी सांगितले. त्यावर शेख मेहबूब यांचे समाधान झाले नाही त्यामुळे दिनांक 31 जानेवारीला दिंद्रुड येथे राहणारे शेख मेहबूब शेख गुलाब, शेख बाबु शेख मेहबूब, निवास सुखदेव गुजर आणि शेख जुबेर शेख अकबर हे चार जण नामदेव कडपे यांच्या ब्राह्मणवाडी शिवारात असलेल्या शेतात आले. त्यावेळी नामदेव कडपे आणि त्यांचा मुलगा केशव हे शेतात काम करत होते.त्यांना पैशाची विचारणा झाल्यानंतर थोड्यावेळासाठी हे चारही जण निघून गेले, आणि त्यानंतर काही वेळाने हे चार जण परत आले आणि उसाने भरलेले ट्रॅक्टर केशव कडपे घेऊन जात असताना त्याला ट्रॅक्टरवरून खाली उतरवून बळजबरीने,मारहाण करून चारचाकी वाहनात भरले आणि त्याचे अपहरण केले. अशी तक्रार दिनांक 31 रोजी आष्टी पोलीस ठाण्यात नामदेव कडपे यांनी दिली आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अद्याप पर्यंत केशव कडपे यांचा तपास लागलेला नाही.
    *दिलीप पोहनेरकर*
    9422219172
    www.edtvjalna,/app-edtvjalna

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    aashti ps edtv ipc363 madhurban f psi shivaji nagve saakshi f
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleतहसीलदारांच्या विरोधात तलाठ्यांनी थोपटले दंड; ९ तारखेपासून तलाठी सामूहिक रजेवर
    Next Article पोटचे मुल नसल्यामुळे महिलेने पळवले होते बाळाला
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    June 19, 2025

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    June 18, 2025

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    June 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,039 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,179 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025794 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025724 Views
    Don't Miss
    Breaking News June 19, 2025

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    जालना- एक लाख रुपयांचे एक कोटी करून देतो असे आमिष दाखवणाऱ्या जालना येथील रतन आसाराम…

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    भ..भ..”भाऊचा” शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एक लाखांचे एक कोटी रुपये करून देण्याचे आमिष; भोंदू बाबाच्या घरात सापडले अघोरी प्रथा आणि जादूटोण्याचे साहित्य

    “ज्ञान संजीवनी फाउंडेशन”, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी संस्था; संचालकांचा दावा

    विद्यार्थ्यांना रममान करणारे प्रकल्प द्या! NEP च्या चर्चासत्रातील सूर

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.