जालना जुन्या मोंढ्यातील  परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि अर्ध्या तासातच ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मालमत्तेचे किती नुकसान झाले याचाही अजून अंदाज आलेला नाही.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version