जालना- सृष्टि फाउंडेशन च्या वतीने 26 जानेवारीला राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर जालना शहरातील प्लास्टिक संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान ही संकलन मोहीम हाती घेतल्यानंतर शहरात अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. हे प्लास्टिक कशासाठी जमा करायचे? याचा उपयोग काय?त्याने काय होणार?या नानाविध प्रश्नांनी अनेकांना हैराण केलेलं असताना जमा केलेल्या या प्लास्टिकचे पुढे काय होणार? याविषयीचा हा विशेष वृत्तांत.

सृष्टी फाउंडेशनच्या अंतर्गत असलेल्या ग्रीन आर्मी फाउंडेशनच्या सहकार्याने हे प्लास्टिक जालना शहरात विविध भागांमध्ये जाऊन जमा केले जाणार आहे. नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणामांची जनजागृती केली जाणार आहे. त्याच सोबत या प्लास्टिकचे पुढे काय होणार !असाही विषय चर्चिला जात आहे. त्यासंदर्भात सृष्टी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. संध्या जहागीरदार आणि ग्रीन आर्मी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच औरंगाबाद येथील प्लास्टिक ची वर्गवारी करणाऱ्या केंद्राला भेट दिली आणि या प्लास्टिकची पुढे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान या प्लास्टिक वर्गवारी प्रक्रिया केंद्राचे प्रशांत रगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार जमा झालेल्या प्लास्टिक मधून कडक प्लास्टिक, रंगीत प्लास्टिक, निरुपयोगी प्लास्टिक, आणि अन्य काही वर्गवारी प्रमाणे कामगारांच्या मदतीने याची वर्गवारी केली जाते. त्याला प्रेसिंग मध्ये दाबून परगावी पाठविण्यासाठी वेगवेगळे गट केले जातात, आणि त्या माध्यमातून हे प्लास्टिक इतर ठिकाणी पुन्हा प्रक्रियेसाठी पाठविले जाते. त्यासोबत सुका कचरा आणि ओला कचरा अशी वेगवेगळी प्रतवारी करून ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न भाजीपाल्यांचे देठं कशापासून बायोगॅस तयार करून शुद्ध आणि निम्मी ज्योत असलेला गॅस घरगुती वापरासाठी देखील कामाला येतो त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागून आर्थिक उत्पन्न देखील यापासून मिळू शकते. दरम्यान जालन्यात जमा झालेले प्लास्टिक हे सृष्टी फाउंडेशन आणि ग्रीन आर्मी फाउंडेशन च्या वतीने पुढील प्रक्रियेसाठी औरंगाबाद येथे पाठविले जाणार आहे. या प्लास्टिक संकलनाच्या माध्यमातून जालना शहराला प्लास्टिक मुक्त शहर करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. या प्रयत्नांना जालना शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शहराला प्लास्टिक मुक्त करावे असे आवाहन अध्यक्ष सौ. संध्या जागीरदार यांनी केले आहे. औरंगाबाद येथील प्लास्टिक वर्गीकरण केंद्राला भेट देण्यासाठी सौ. जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली सृष्टी फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या ग्रीन आर्मी फाऊंडेशनच्या पदाधिकारी प्रतिभा श्रीपत, प्रा. तारा काबरा, मंजू शिरसागर, जयश्री कुणके, यांची उपस्थिती होती.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version