जालना -पैठण येथून रायपुर कडे गुळाचे 134 पोते (एक पोते 30 किलो) घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने मोती बागेसमोर धडक दिली.

या अपघातामध्ये गुळाच्या ट्रकचे फारसे नुकसान झाले नाही, मात्र बेंगलोर येथून जालना औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक टी. इन. ५२ए ९२१८ चे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या ट्रकचा समोरचा पूर्ण भाग चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान ट्रकचा चालक पल्लली स्वामी कुपांडी,38, राहणार वेडापट्टी सेलम,( तामिळनाडू) याच्या पायाला गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान गुळाच्या ट्रक क्रमांक सी जे०७ बी एल ९९९३ चे फारसे नुकसान झाले नाही, परंतु चालकाने हा ट्रक कदीम जालना पोलिस ठाण्यात आणून उभा केला आहे. मोतीबाग समोरच झालेला अपघात नेमका कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो हेच नक्की ठरवता येत नसल्यामुळे पंचनाम्याला बराच उशीर झाला .दरम्यान शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत ,कॉन्स्टेबल एस. सी. चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version