जालना- शहरालगत असलेल्या मोतीबाग तलावातून अवैध पाणी उपसा होऊन त्याची विक्री होत असल्याची तक्रार जालना पालिकेकडे करण्यात आली होती.

या तक्रारीची शहानिशा जालना नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आणि त्यामध्ये तथ्य असल्याचे लक्षात आले आहे. त्या अनुषंगाने जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी आज संयुक्त कारवाई करत मोती तलावात असलेल्या या अनधिकृत कूपनलिकांची पहाणी करून विद्युत पंप, वायर ,आणि पाणी उपसा करण्यसाठी पाईप यासह अन्य साहित्य जप्त केले आहे.

तलावातून उपसा केलेले हे पाणी औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कारखान्यांना विकल्या जात आहे,तसेच तलावाच्या काठावर घेण्यात येणाऱ्या पिकांनाही या पाण्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या कूपनलिका कोणाच्या आहेत हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही.

*दिलीप पोहनेरकर,*९४२२२१९१७२*
https://edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv  
*बातमी अशी;जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version