जालना- उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ जालना शहरातील विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत आज जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढला .

अंबड चौफुली परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासाठी तगडा बंदोबस्त ही पोलिसांनी तैनात ठेवला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की ,राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली हत्या साधारण नसून भारताच्या सार्वभौमत्वासह शांतीप्रिय समाज, संविधान व लोकशाही वरील धर्मांध आक्रमण आहे .या हत्येमागे जिहादी मानसिकता निर्माण करण्यासाठी मदरसे, मौलवी व तालबानी विचारांच्या संघटना जबाबदार आहेत. त्यामुळे सरकारने अशा संघटनांवर बंदी घालावी तसेच ज्यांनी हत्या केला त्यांना पकडून हा प्रश्न सुटणार नाही तर ज्या संघटना अशा आतंकवाद्यांना आश्रय देतात त्यांचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

आजच्या या मोर्चामध्ये सुनील खरे, अमित कुलकर्णी, धनसिंग सूर्यवंशी, वेणुगोपाल झंवर, अशोक पडूळ ,अर्जुन डहाळे, अंबादास अंभोरे, विकी हिवाळे, आदींची उपस्थिती होती.दरम्यान या मोर्चासाठी कदिम जालना पोलीस, तालुका जालना यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version