जालना-विघ्नहर्ताच्या विसर्जनामध्ये कसल्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून स्वतःच्या आनंदाला बाजूला न सारता तो आनंद लुटत इतरांनाही आनंद लुटता यावा म्हणून मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस आज सकाळीच आपापल्या नियोजित ठिकाणी पोहोचले.

दरम्यान तिथे पोहोचण्यापूर्वी पोलीस ठाण्यामध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला निरोप द्यायलाही ते विसरले नाहीत. पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या कल्याणी नदीमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत दरम्यान पोलिसांनी तडम ताशाच्या आवाजावर बेभान होऊन आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली, आणि आनंद लुटला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, जमादार गोडबोले, प्रशांत देशमुख, मच्छिंद्र वाघ, प्रकाश जाधव, सतीश श्रीवास, समीन बर्डे, नितीन मतकर, रवींद्र इथापे, नितीन खरात, अविनाश मांटे, यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवानही उपस्थित होते. दरम्यान पोलिसांचा हा उत्साह पाहून परिसरातील नागरिकांना व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. तोच हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version