जालना- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जालन्यासह परिसरातील जिल्ह्यामध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरत आहे .या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. अशा प्रकारची कोणतीही टोळी आली नसल्याचा खुलासा केला आहे. नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या या आवाहनात म्हटले आहे की, अशा प्रकारची कोणतीही टोळी किंवा घटना जालना जिल्ह्यात अथवा बाजूच्या जिल्ह्यातही आलेली नाही, आणि घटनाही घडली नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे रात्रंदिवस 24 तास गस्त घालत आहेत. एखाद्याला संशयित व्यक्तीला शहानिशा केल्याशिवाय मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे, असा संशयित कोणी आढळल्यास पोलिसांच्या स्वाधीन करावे . तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना अफवांवर विश्वास ठेवू नये असेही कळविण्यात आले आहे. मुलांच्या पळवा पळवी संदर्भात किंवा काही अनुचित प्रकार घडताना दिसल्यास नागरिकांनी पोलिसांच्या 112 या नंबर वर किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष जालना, दूरध्वनी क्रमांक02482-225100,224833 येथे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

*एम.डी. पोहनेरकर*8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com
इमेल-edtvjalna@gmail.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version