घनसावंगी-मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद यांच्या कडून दरवर्षी दिला जाणारा, “राज्यस्तरीय आदर्श  दर्पणरत्न पुरस्कार 2022”  पत्रकार अविनाश घोगरे यांनाजाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पत्रकार, संपादक, वार्ताहर , यांच्या कार्याचा विचार करून ,त्यांच्या सामाजिक बांधिलकी चां सर्वांगीण विचार करून, त्यांच्या कृतुत्वाचा सन्मान म्हणून, त्यांच्या कार्याचे उचित मूल्यमापन व्हावे यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो .

 

 

पत्रकारिता क्षेत्रात अती उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामजीक प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून हिरारीने मांडणाऱ्या, आपल्या लेखणी च्या माध्यामातुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या व समाजहित जोपासणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय पत्रकार दर्पणरत्न घोषित करण्यात येतो . पत्रकार अविनाश घोगरे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अनेक वर्षांपासून निर्भीड,निःपक्ष पत्रकारिता करीत आहेत, आपल्या पत्रकारितेतुन त्यांनी आजवर अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील सर्व पत्रकार,घनसावंगी शहरातील ,प्रतिष्ठित नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले  आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version