श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीराम मूर्तींच्या पुनःस्थापना सोहळ्यानिमित्त 25 किलोमीटर आणि सहा तास चाललेल्या मिरवणुकीचा हा थोडक्यात वृत्तांत .ज्यांना प्रत्यक्ष पाहता आला नाही त्यांच्यासाठी ही घरी बसून पाहण्याची संधी.

घनसावंगी -समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून श्रीरामांच्या मूर्तीची 22 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नाने या मूर्ती सापडल्या आहेत आणि त्यांची पुनःस्थापना शनिवार दिनांक 26 रोजी होत आहे. तत्पूर्वी दिनांक 25 रोजी या मूर्ती न्यायालयाच्या आदेशान्वये घनसांवगी पोलीस ठाण्यातून मंदिराच्या विश्वस्थाकडे कडे सुपूर्द करण्यात आल्या.

घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या मूर्ती समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण महारुद्र स्वामी यांच्याकडे त्या सुपूर्द केल्या. यावेळी पोलीस ठाण्यातच मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. घनसावंगी पोलीस ठाणे ते श्रीक्षेत्र जांब हे सुमारे 25 किलोमीटरचे अंतर. या पंचवीस किलोमीटरच्या अंतरा दरम्यान सहा तास ही मिरवणूक सुरू होती. मुख्य रस्त्यावरच सडा रांगोळ्या आणि पुष्पवृष्टी होत होती. जांब समर्थ हे मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर आत मध्ये असलेले गाव .मूर्ती परत जांब समर्थ मध्ये येत आहेत या आनंदाला भाविकांमध्ये पारावारच नव्हता. पूर्ण गावच्या गाव मुख्य रस्त्या जवळ येऊन थांबले होते, आणि श्री रामरायांच्या आगमनाची वाट पाहत होतो. ठीक ठिकाणी भाविकांचे जथ्थे दिसत होते. कुठलंही देहभान न ठेवता भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. जांब समर्थ मध्ये गुढया, पथाका उभारून श्रीरामांच्या मूर्तीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मागे झाला का नाही माहित नाही मात्र पुढे असा सोहळा पुन्हा होणे नाही. असा हा भव्य दैदिप्यमान सोहळा समर्थांच्या नगरीत भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version