जालना-आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा प्रसार करण्यासाठी आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी उद्या रविवार दिनांक आठ रोजी जालन्यामध्ये” एक दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद”चे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक गुरुकुल परिवार महाराष्ट्र यांनी या परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या परिसंवादाविषयी तसेच आयुर्वेद चिकित्सा पद्धती विषयी सामान्य माणसात असलेले गैरसमज दूर करण्याचा या परिसंवादातून प्रयत्न केला जाणार असून जीवनातील आणि उपचार पद्धतीतील आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आयुर्वेद दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीचे उद्घाटन सदर बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयुर्वेद चिकित्सेसंबंधी असलेल्या ग्रंथांची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयुर्वेदाशी निगडित असलेल्या विविध औषधी वनस्पतींचाही समावेश होता.
दरम्यान उद्या दिवसभर होणाऱ्या या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादासाठी देशभरातून सुमारे 2000 वैद्य उपस्थित राहणार आहेत आणि ते या आयुर्वेदा विषयी आपले विचार मांडणार आहेत. त्यामध्ये कन्याकुमारी येथील वैद्य एल.महादेवन, धुळे येथून वैद्य प्रवीण जोशी दिल्ली येथील वैद्य दिव्या कजारिया आणि बेंगलोरच्या वैद्य निशा मनीकांचन या उपस्थित राहणार आहेत .अशी माहिती वैद्य प्रवीण बनमेरू यांनी दिली आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com