जालना- जालना शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या मोती तलावात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका तीस वर्षीय विवाहितेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.चौपाटी भागाकडे काही नागरिक बसलेले असताना त्यांच्या समोरच या महिलेने तलावात उडी मारली.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये यश आले नाही .पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दरम्यान हातामध्ये एक मराठीमध्ये जादूटोण्याविषयी काही लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे .पाच फूट उंच, रंग काळा सावळा, अंगामध्ये लाल रंगाची शर्ट सलवार, नाकामध्ये नथ, मंगळसूत्र या वर्णनावरून ही महिला हिंदू आणि विवाहित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्यामुळे या पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्री. वेताळ यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली त्यावेळी नागरिकांनी या महिलेला उडी मारताना पाहिले होते आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न देखील या नागरिकांनी केला होता मात्र त्यांना यश आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत महिलेचे नातेवाईक कोणीही समोर न आल्यामुळे तिची ओळख पटलेली नाही, आणि तिने का आत्महत्या केली? याचा देखील उलगडा झालेला नाही. वरील वर्णनाची महिला कोणाची नातेवाईक असेल तर त्यांनी चंदनजीरा पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com