जालना -उसाच्या फडातील खोपीमध्ये नवरा बलात्कार करत असताना त्याच्या बायकोनेच खोपीच्या बाहेर उभे राहून रखवालदारी केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. दरम्यान अंबड पोलीस ठाण्यातून हा गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.


या धक्कादायक घटनेची हकीकत अशी की , शुक्रवार दिनांक 27 रोजी जालना शहरातील गांधीनगर भागात राहणारी 21 वर्षीय महिला घनसावंगी तालुक्यातील रामसगव्हाण खुर्द शिवारात ऊस तोडी साठी गेली होती. दरम्यान या शेतामध्ये असलेल्या खोपीमध्ये राम भगवान जाधव आणि वर्षा राम जाधव हे पती-पत्नी राहत होते. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वर्षा जाधव हिने या 21 वर्षीय तरुणीला राम भगवान जाधव याच्या खोपी मध्ये पाठवले आणि बाहेरून दार लावून घेऊन तिथेच उभी राहिली. दरम्यान राम भगवान जाधव यांनी या 21 वर्षीय तरुणी सोबत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याची तक्रार या विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी सदरील हद्द ही आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्यामुळे अंबड पोलिसांनी हा गुन्हा आष्टी पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी भादवि कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा नोंद करून पुरुष आरोपीला अटक केली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version