परतूर-अवैध गौण खनिजाच्या उत्खननाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह त्यांच्या पथकाला मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कावजवळा सज्जाचे तलाठी विजय विष्णू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महेश उर्फ डुबऱ्या चव्हाण यांच्यासह अन्न दोन जणांविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतुर तालुक्यातील डोलारा शिवारात वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाली, त्यानुसार ते तलाठी विजय विष्णू जाधव आणि काही सहकाऱ्यांसह परतुर ते डोलारा रस्त्यावर डोलाऱ्या जवळील पानंद रस्त्यावर पाहणी करण्यासाठी गेले होते .यादरम्यान त्यांना वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर दिसले त्यावेळी या ट्रॅक्टरची चौकशी करण्यासाठी तलाठी व त्यांचे सहकारी गेले असता ट्रॅक्टरचा चालक महेश उर्फ डुबऱ्या चव्हाण याने ट्रॅक्टर वर बसून तलाठ्यासह अन्य एकाला मारहाण केली. तसेच उर्वरित दोघांनी देखील तलाठ्याला मारहाण करून खाली पाडले. याच वेळी विजय जाधव या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर अंगावर घालून ठार मारण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी तलाठी विजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतुर पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि गौण खनिजाची चोरट्या मार्गाने वाहतूक करण्यात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून तीनही आरोपींनी पळ काढला आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com