जालना- जीडीसी प्रकरणातील जालना जिल्ह्यात प्रमोटर म्हणून काम केलेले किरण खरात आणिसौ. दीप्ती खरात यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी लांबली असून ती आता दिनांक दहा रोजी होणार आहे.

GDC म्हणजेच गोल्ड डिजिटल कॉइन, ज्याला क्रिप्टो करेंसी म्हणून देखील ओळखल्या जाते. या जीडीसी मध्ये फसवणूक केल्याची तक्रार दिनांक 16 जानेवारी रोजी ऋषिकेश शेषराव काळे यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने या जीडीसी चे प्रमोटर किरण खरात त्यांची पत्नी सौ. दीप्ती खरात आणि अन्य काहीजणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. व सौ. खरात यांच्याकडून न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्या गेला, मात्र सुनावणी लांबली होती. आज दि.7 रोजी पुन्हा एकदा ही सुनावणी लांबली आहे. आता दिनांक दहा रोजी या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान या जीडीसी फसवणूक प्रकरणातील चार आरोपी पुणे येथून आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने दिनांक तीन रोजी पहाटे जालन्यात आणले होते त्यांना चार तारखेला न्यायालयात हजर केले असता बुधवार दिनांक आठ पर्यंत पोलीस कोठडी सून आली होती. उद्या दिनांक आठ रोजी पुन्हा या चार आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान तपास पूर्ण न झाल्यामुळे गुन्हे आर्थिक शाखेच्या वतीने या आरोपींची पोलीस कोठडीची मुदतवाढ वाढवून घेण्याची शक्यता आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version