सैन्य दलाच्या नंतर देशाची आणि समाजाची सुरक्षा व्यवस्था कोणाच्या हातात असेल तर ते म्हणजे पोलीस त्यामुळे पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते त्यासाठी शासन त्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य देखील पुरवते मात्र पोलीस ते अद्यावत करत नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या औरंगाबाद परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी कदीम जालना पोलिसांची पुन्हा दुसऱ्या दिवशी दप्तर तपासणी केली.

 

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि मदतीसाठी पोलीस यंत्रणेवर भर दिला जातो त्यामुळे त्यांना कुठेही कधीही कितीही दिवस मुक्काम ठोकावा लागतो आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या वतीने त्यांना विविध साहित्य पुरविले जाते या साहित्यामध्ये सुमारे 27 बाबींचा समावेश आहे त्यामध्ये अंथरून पांघरूणापासून थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर बॅग वेळप्रसंगी शत्रूशी दोन हात करण्यासाठी लागणाऱ्या खंजिराचा देखील समावेश आहे पूर्वी हे साहित्य शासन देत होते मात्र गेल्या पाच सात वर्षांपासून शासनाने यामध्ये बदल करून कर्मचाऱ्यांना रोखीने दरवर्षी पाच हजार रुपये हे साहित्य खरेदी करण्यासाठी दिला जातात प्रत्यक्षात मात्र या साहित्यामधील अर्ध साहित्य हे एकदा खरेदी केले तर पुन्हा खरेदी करण्याची गरजच पडत नाही असे असतानाही हे साहित्य अद्यावत ठेवण्यासाठी पोलिसांची उदासीनता असते आहे गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि विविध पोलीस ठाण्यांच्या तपासण्या ते करीत आहेत त्याचदरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी कधी जालना पोलीस ठाण्याची तपासणी केली आणि इथे असलेल्या सुमारे 60 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 30 कर्मचाऱ्यांनीच आपले दप्तर तपासणीसाठी ठेवले होते त्यामुळे नाराज झालेल्या श्री प्रसन्न यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक सात रोजी दप्तर तपासण्याच्या सूचना केल्या त्यामुळे कधीम जालना पोलीस ठाण्याच्या मैदानावर पुन्हा एकदा या पोलिसांनी आपली दप्तरे तपासणीसाठी ठेवली होती रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना मात्र कधी जालना पोलीस कुठल्यातरी मोठ्या मोहिमेवर जात आहेत की काय असा भास होत होता दरम्यान काल ही संख्या वाढल्यामुळे मल्लिकार्जुन प्रसन्न यांनी समाधानही व्यक्त केले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version