जालना-महाराष्ट्र शरण साहित्य परिषद आयोजित पहिले शरण संत साहित्य संमेलन जालन्यात दिनांक 26 फेब्रुवारी रोजी होत आहे. मंठा चौफुली परिसरात असलेल्या कलश सीड्स च्या सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता कर्नाटक मधील भालकी येथील हिरेमठ संस्थांचे बसवलिंग पट्टेदेवरू यांच्या अध्यक्षतेखाली, आजरा जिल्हा कोल्हापूर येथील राजाभाऊ शिरगोपे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भालकीचे राजू जुबरे यांच्यासह स्वागताध्यक्ष एड. मधुकर आप्पा लिंगायत यांच्यासह कार्याध्यक्ष प्राध्यापक बसवराज कोरे, निमंत्रक शरद आप्पा सवादे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
अशी माहिती या संमेलनाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.सविस्तर माहिती देताना बसवराज कोरे यांनी सांगितले की, लिंगायत ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ बसवेश्वरांनी सुरू केले आहे. त्यामुळे या चळवळीमध्ये सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारी ही चळवळ आहे. तसेच जो स्वतःच्या कामावर मेहनतीवर जगतो त्याला लिंगायत संबोधले जाते, आणि म्हणूनच भारतात कुठेही लिंगायत भीक मागताना दिसत नाहीत .त्यासोबत महात्मा बसवेश्वरांनी जातिवाद मोडून काढला आहे आणि त्यांनी केलेल्या या कामाला पुन्हा उजाळा देण्यासाठी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com