जालना- पाकिस्तान हा अखंड हिंदू राष्ट्राच्या छातीवरचा कलंक आहे, तो मिटवायचा आहे. पाकिस्तानचे नामोनिशान मिटवून वीर सावरकरांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र स्थापन करणे हे माझे स्वप्न आहे आणि ते मी करेल. त्यासोबत ज्या संघटना पाकिस्तानला मदत करतील त्यांचा मी विरोध करेल. असा अप्रत्यक्ष इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे.

आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी येथे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक डॉ. प्रवीण तोगडिया यांची जाहीर सभा आहे. त्या सभेला जाण्यापूर्वी त्यांनी जालन्यामध्ये बडी सडक वर असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेतले, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

भारताच्या लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलताना ते म्हणाले ,लोकसंख्या नियंत्रणाबद्दल जर कायदा केला नाही तर सध्या तयार होत असलेले अयोध्येतील राम मंदिर पन्नास वर्षानंतर दिसणार नाही , हिंदूंचे घरेही दिसणार नाहीत, हिंदूही सुरक्षित राहणार नाहीत. तसेच राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये ज्यांनी मशिदीवरचे भोंगे उतरवले त्यांनी शिंदे सरकारच्या काळातही पुन्हा आंदोलन करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार मशिदीवरील भोंगे यांना रात्री 10 ते सकाळी सूर्योदयापर्यंत परवानगी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version