जालना- सेवानिवृत्तीमुळे ज्येष्ठ झालो असलो तरी आम्ही समाजाचे काही देणे लागतो, त्यामुळे समाजात चांगले काम करत असलेल्या व्यक्तींचा सन्मान, सत्कार करणे, त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कामांसाठी प्रेरणा देत राहणे या भावनेतून सुरू झालेल्या प्रेरणा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने समाजातील काही मान्यवर व्यक्तींचा नुकताच सत्कार करण्यात आला.

या सत्कारामध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे ,जे.इ.एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, लेखक प्राध्यापक पंढरीनाथ सारखे, कवी सुनील लोणकर यांचा समावेश होता. नुकत्याच एका छोटेखाली कार्यक्रमात या चारही सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बाळकृष्ण पाठक ,गजानन देशमुख ,डॉ. बी. बी. ढोबळे श्री. जगताप यांनी परिश्रम घेतले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version