जालना-विद्यार्थ्यांना शिस्त आणि उच्च शिक्षणाच्या नावाखाली पालकांचे खिसे रिकामे केल्या जातात.अशाच एका इंग्रजी माध्यमच्या शाळेने पुन्हा पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे ठरवले आणि पालकांच्या सतर्कतेमुळे शाळेची ही “शाळा” फसली आहे.

जालना- परभणी रस्त्यावर चौधरी नगर परिसरात एक नामांकित इंग्रजी माध्यमची शाळा आहे. या शाळेमध्ये उच्चभ्रू आणि धनदांडग्यांची मुले शिक्षण घेतात. नेमकी हीच संधी डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे आणि शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एका खाजगी क्लासेस कडे वळवण्याचे ठरवले,आणि या क्लासेस सोबत करार करून क्लासेस विषयीची माहिती देण्यासाठी रविवारी दोन सत्रामध्ये पालकांनाही बोलावले होते. त्या संदर्भात सर्वांना संदेशही गेले आणि पालकांमध्ये खळबळ सुरू झाली. शाळेमध्ये हजारो रुपये फी देत असताना पुन्हा क्लासेस कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि क्लासेस लावायलाही पालकांची अडचण नव्हती, मात्र शाळा जर एखाद्या क्लासेस चे नाव पुढे करत असेल तर मग शाळेचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला गेला, आणि दुसऱ्या मार्गाने पुन्हा पालकांच्या खिशावर डल्ला मारून या खाजगी क्लासेस चालकांचे खिसे भरण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली.

रविवारी हे चर्चासत्र असल्यामुळे शनिवारी दिवसभर पालकांमध्ये सुरू झालेल्या या चर्चेची कुणकुण व्यवस्थापनाला लागली, त्यामुळे व्यवस्थापन देखील हातबल झाले आणि या खाजगी क्लासेसच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे पालकांना सांगण्यात आले. सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना काय उच्च शिक्षण देणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. आणि जर द्यायचेच असेल तर भरमसाठ फी घेणाऱ्या शाळेच्या वतीने का दिला जात नाही? त्यासाठी पुन्हा खाजगी क्लासेस कशासाठी? या सर्व कुजबुजी नंतर काल आयोजित करण्यात आलेल्या पालक, शाळा व्यवस्थापन आणि खाजगी क्लासेस चालक यांच्या कार्यशाळेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बोटावर मोजण्या इतकेच पालक उपस्थित झाले .त्यामुळे पालकांच्या सतर्कतेमुळे या शाळेने पालकांसोबत “शाळा” करण्याचा प्रयत्न फसला आहे. जालना शहरात एकापेक्षा एक नामावंत क्लासेस असताना बाहेरच्या जिल्ह्यातून या क्लासेस चालकांना बोलावून त्यांचे खिसे भरण्याचा व्यवस्थापनाचा हा उद्देश असल्याचा आरोप पालकांसोबत अनेक क्लासेस चालकांनी केला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version