भोकरदन- मोबाईलवर स्टेटस ठेवल्याचा कारणाहून भोकरदन तालुक्यातील शहराजवळील आलापूर भागात (ता.25) मंगळवारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची जमानत झाली आहे.
दुसऱ्या तक्रारीमध्ये मोबाईलवर स्टोरी बनविण्याच्या कारणाहून जनार्धन उत्तम तळेकर, विष्णू पंढरीनाथ तांगडे, विनोद विष्णू तळेकर, गणेश उत्तम तळेकर, सुमित गारखेडे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत डोक्यात काठी मारून दुखापत केल्याची तक्रार गुलमोहम्मद नाजीम शाह यांनी दिली आहे. या दोन्ही तक्रारीवरून अकरा जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बजरंग कुटूंबरे करीत आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com