जालना -महाराष्ट्र राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे .शहरी भागातील जनसामान्यात गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना ही आरोग्य केंद्र दिनांक एक मे पासून स्थापन केली जाणार आहेत.

शहरी भागातील जनतेला याचा फायदा व्हावा हा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचे दवाखाने सुरू होणार आहेत .जालना जिल्ह्यात एकूण वीस दवाखाने सुरू केले जाणार आहेत .त्यामध्ये जालना शहर 10, अंबड तीन, परतुर दोन, आणि भोकरदन बदनापूर ,जाफराबाद ,घनसांवगी, मंठा, प्रत्येकी एक दवाखाना सुरू केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाणार आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायत च्या जागा या दवाखान्यासाठी अधिकृत करण्यात आल्या आहेत .प्रत्येक दवाखान्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक सुरक्षा गार्ड आणि सफाई कर्मचारी असा पाच जणांचा जम्मू काम करणार आहे .

दुपारी दोन ते रात्री 10 पर्यंत हे दवाखाने सुरू राहणार असल्यामुळे दिवसभर कामकाजामुळे वेळ न मिळालेल्या गरजूंना त्यांच्या वेळेनुसार दवाखान्यात उपचार घेता येणार आहेत. इथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला 60 हजार, 7 स्टाफ नर्स ला 20हजार, बहुउद्देशीय कर्मचाऱ्याला 18 तर ,सुरक्षा गार्ड आणि स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्येकी 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. यासंदर्भात जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या दवाखान्यामध्ये नियमित तपासण्यासोबतच विशिष्ट प्रकारच्या तपासण्या देखील केल्या जाणार आहेत, आणि त्यासाठी एक दिवस ठरवून दिल्या जाणार आहे. मोफत तपासणी मोफत उपचार ,मोफत औषधी, तिथे मिळणार आहेत. जालना जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”साठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचेही डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version