जालना -बदनापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची उद्या दिनांक 30 रोजी निवडणूक आहे .या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनापूरचे तत्कालीन उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार नारायण कुचे या दोघांमध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याच्या आरोप प्रत्यारोपावरून शुक्रवार दिनांक 28 रोजी चांगलीच जुंपली होती.
दोघेही समोरासमोर आल्यानंतर एकेरी भाषा ही वापरली गेली. पोलिसांकडे तक्रारीही झाल्या आणि आता या सर्व प्रकाराचा साक्षीदार असलेला सीसीटीव्ही कॅमेरा ही तपासल्या जाणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होतो त्याकडे आता बदनापूर विधानसभा आणि अंबड तालुक्यातील मतदारांसह व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे .या दोघांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये बदनापूर विधानसभा मतदार संघामधून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी यांनी त्यांचे नेते तथा माजी मंत्री आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांची बाजू घेत यामध्ये उडी मारली आहे. तर आमदार नारायण कुचे यांनी देखील या सर्व आरोप प्रत्यारोपांमध्ये राजेश टोपे यांचा हात असून मतदार सत्ता बदल करण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचा आरोपही केला आहे
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com