जालना -जालना शहराची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये स्टीलचे शहर म्हणून ओळख झाली आहे ,आणि याचा प्रत्यय म्हणून स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या” भंगार आणि त्याच्या पुनर्वापराची दुसरी परिषद”( स्क्रॅप रिसायकलिंग) जालन्यात काल पार पडली.
या परिषदेसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा कोळसा व खान मंत्री रावसाहेब दानवे, यांच्यासह केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती. या परिषदेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जालन्यात असलेल्या स्टील उद्योगांमध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या सर्व तरुण उद्योजकांनी या संकल्पनेविषयी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नवनवीन कल्पना मांडल्या ,आणि एकंदरीत जालना शहरात सुरू असलेला स्टील उद्योग देश पातळीवर किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तरुण उद्योजकांनी दाखवलेल्या प्रेझेंटेशन ला केंद्रीय अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून खाचखळगे समजून घेण्याचाही प्रयत्न केला. या सर्व परिषदेचा सारांश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितला तो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा EDTV NEWS चा हा प्रयत्न.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com