जालना- डिसेंबर महिन्यात भरती करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 171 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्याच सोबत कामाच्या बदल्यात मिळणारा प्रोत्साहन भत्ता देखील सहा महिन्यांपासून मिळालेला नाही. त्यामुळे ही डॉक्टर मंडळी आता संपावर जाण्याच्या तयारीत आहे.

जालना जिल्ह्यात ग्रामीण भागात राहून आरोग्यसेवा सांभाळणारे हे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले आहे तर प्रोत्साहन भत्ता सुरुवातीपासून मिळालेच नाही. या आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये महिलांचा देखील मोठा समावेश आहे. त्यामुळे घर चालवण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी या महिलांनी  केल्या आहेत. कोविडच्या काळात पडेल ते काम करावे लागले आहे मात्र आता तीन महिन्यांपासून शासन लक्ष देत नाही .जिल्हा परिषदेमध्ये वारंवार मानधनाची मागणी करूनही ती पूर्ण होत नाही .त्यामुळे आता येत्या तीन दिवसात हे मानधन मिळाले नाही तर संपावर जाण्याचा इशारा देखील या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी हे समुदाय आरोग्य अधिकारी आज जिल्हा परिषदेमध्ये आले होते.

ताज्या  बातम्या पहाण्यासाठी डाऊनलोड करा edtv jalna app

Share.

Comments are closed.

Exit mobile version