जालना -मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास संजय पवार या तरुणाने पत्नीचा खून केला आणि स्वतः देखील शेतामध्ये जाऊन गळफास घेतला आहे.
दरम्यान याप्रकरणी परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे ,मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवळे, यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मात्र अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आणि खुनाचे कारणही समजले नाही.
आज दुपारी दीड वाजता तीस वर्षाच्या संजय अंकुश पवार यांनी त्याची पत्नी संगीता संजय पवार हीला घरामध्ये कोंडले आणि लोखंडी पहारीने मारहाण केली. या मारहाणी मध्ये ती ओरडत असताना आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली परंतु संजय पवार हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दार उघडेपर्यंत संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेली होती. तिचा जागीच मृत्यू झाला यानंतर संजय पवार दार उघडून पळून गेला, आणि एका शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवळे, आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दहिफळ खंदारे येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https:///store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com