मंठा- शुभांगी,आई,नायक,मल्हार ,जय सेवालाल ,एवढेच नव्हे तर देवा,ला देखील मंठा पोलिसांनी सोडले नाही. त्यासोबत दीड लाखाची गाडी घेऊन गल्लीबोळातून…. सारखे आवाज काढणाऱ्या बुलेट स्वारासह तब्बल 24 जणांवर कारवाई केल्यामुळे मंठा शहरात आज दि.18 रोजीएकच खळबळ उडाली होती.


दुचाकी वर अधिकृत क्रमांक न टाकता आपल्याला हव्या त्या नावाचा उल्लेख करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आज धडक कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान दुचाकी वर नंबर नसलेल्या तसेच मागून पुढून वेगवेगळी नावे असलेल्या एकूण 24 दुचाकीवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. या वाहनांवर शुभांगी ,आई,राजे,देवा,मल्हार, जय सेवालाल, छत्रपती,अशा विविध प्रकारच्या नावांचा समावेश होता. क्रमांक नसल्यामुळे अनावधानाने एखादा अपघात झाला तर ही दुचाकी कोणाची आहे? हे शोधणे देखील पोलिसांना कठीण जाते. त्यामुळे दुचाकी वर विहित नमुन्यात क्रमांक असणे हे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र याचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. क्रमांक न टाकता दुसरेच नाव टाकल्यामुळे फारसा काही त्रास होत नाही मात्र दीड लाखांची बुलेट घेऊन गल्लीबोळातून फाटका आवाज काढत फिरत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो, अनेकांच्या घरी वृद्ध असतात काहींच्या घरी विद्यार्थी अभ्यास करत असतात त्यांना याचा फटका बसतो. त्यामुळे देखील पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
,www.edtvjalna.com,https://youtube.com/@edtvjalna5167

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version