जालना -ब्राह्मण समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 24 रोजी 41 बटुंवर सामूहिक उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. या संदर्भात विविध समित्या आणि बटूंना देण्यात येणाऱ्या साहित्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच बटूंचे फक्त उपनयन नव्हे तर त्यांना संस्कारक्षम बनविण्याची जबाबदारी निरामय हॉस्पिटलच्या डॉ. पद्माकर सबनीस यांनी घेतली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष दाणी यांनी दिली.

दिनांक 24 रोजी पाठक मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी हा उपनय संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .तत्पूर्वी पारंपारिक पद्धतीने बटूंची मिरवणूक, मातृभोजन हे सर्व विधी पार पाडले जाणार आहेत. या तयारीसाठी मागील महिनाभरापासून या समितीचे सुमारे 30 कार्यकर्ते झटत आहेत. समितीचे हे दुसरे वर्ष असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करून कार्यक्रम पार पाडण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे .त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे बटूंना आशीर्वाद देण्यासाठी सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी महाराजांचे वंशज भूषण स्वामी यांच्यासह जालना जिल्ह्यातील संत महंतांची उपस्थिती राहणार आहे.
बटूंना देण्यात येणारे सर्व साहित्य( कद, संध्या ताम्हण, प्याला, पळी, पुस्तक, आणि अन्य साहित्य) दात्यांनी उपलब्ध करून दिले आहे, तर उपनयन संस्कार झाल्यानंतर बटूंसाठी संध्या शिकवण्याची जबाबदारी निरामय हॉस्पिटलचे डॉ. पद्माकर सबनीस यांनी घेतलेली आहे. त्यामुळे फक्त संस्कार करून सोडून न देता या बटूंना संस्कारक्षम घडविण्याचाही या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती देखील अध्यक्ष संतोष दाणी यांनी दिली.


सामूहिक उपनयन संस्कार समितीमध्ये कार्याध्यक्ष किरण मुळे, सचिव प्रा. डॉ. पवन देशमुख, कोषाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुरेंद्र न्यायाधीश ,भगवान पुराणिक यांच्यासह सतीश अकोलकर, शिवाजी जोशी, रवींद्र देशपांडे, डॉ. संजय रुई खेडकर, दिलीप दाणी, सुरेंद्र कल्याणकर, नितीन देव, जगदीश गौड, सतीश देशपांडे, दिलीप देशपांडे, महेश वझरकर, राजू बालूरकर, सुचित कुलकर्णी, रवी जोशी, आदींचा समावेश आहे. महिला समितीमध्ये देखील सौ.अरुणा फुलमामडीकर, सौ. मृणाल कुलकर्णी, सौ.अनिता देशपांडे, सौ. मीरा मुळे, सौ.माधुरी देशमुख ,यांच्यासह लीला पुराणीक,सौ.वंदना जोशी, सौ.अश्विनी भालेराव, सौ.निर्मला गौड यांचा समावेश आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
,www.edtvjalna.com,you tube edtv jalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version