जालना- पूर्वजांनी केलेल्या सत्कर्मामुळेच आपला जन्म भारतात झाला आहे .असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्कप्रमुख तथा आसाम प्रांतच्या प्रचारिका नीता देवी यांनी केले आहे.राष्ट्रसेविका समिती देवगिरी प्रांतच्या वतीने दिनांक पाच ते 20 मे दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमृता कुलकर्णी यांची उपस्थिती होती. शहरातील ग्लोबल गुरुकुल या शाळेच्या मैदानावर हे शिबिर पार पडले. पुढे बोलताना नीता देवी म्हणाल्या की राष्ट्रसेविका समिती मधून माणसांना घडविण्याचे कार्य केले जाते. फक्त माणसंच माझे नातेवाईक नाही तर ही पूर्ण पृथ्वीच माझा परिवार आहे अशी भावना रुजविल्या जाते. त्यामधूनच तेजस्वी राष्ट्राची निर्मितीही केल्या जाते. म्हणून फक्त ध्येय एक असून चालणार नाही तर आपले हृदय देखील एक झाली पाहिजेत असे आवाहनही नीता देवी यांनी केले आणि भा- म्हणजे ज्ञान- तेजस्विता, आणि रत- म्हणजे रममान होणे म्हणजेच भारत असेही त्या म्हणाल्या.


दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.अमृता कुलकर्णी यांनी उपस्थित तरुणींना मार्गदर्शन करताना सांगितले की, तरुणींनी शारीरिक सबलीकरणासोबतच मानसिक धैर्य आणि मनावर ताबाही ठेवला पाहिजे हे सर्व करण्यासाठी सकस आहार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान या शिबिराच्या समारोपाच्या पूर्वी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून पथसंचलनही केले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version