जालना-हरलेल्या क्षणाला कवटाळून बसू नका आणि परिस्थितीला दोष देणे बंद करा! असा महत्त्वाचा सल्ला शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.रंजन गर्गे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. बदलाचा संबंध प्रामुख्याने विचारधारेशी कसा असतो? हे समजावून सांगण्यासाठी ते आज विद्यार्थ्यांमध्ये बोलत होते. जालना एज्युकेशन फाउंडेशन अगस्त फाउंडेशन मराठी विज्ञान परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यामाने आठवी, नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयातील उत्सुकता त्याची,त्यांना न सापडलेली उत्तरे आणि भारावून सोडणारे प्रश्न या सर्वांचा उहापोह करण्यासाठी विज्ञानाच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी” विज्ञान छंद शिबिर” या तीन दिवसीय शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे, शिबिराचा आज दुसरा दिवस आहे. मामा चौकामध्ये सध्या हे शिबिर सकाळी नऊ ते चार अशा पद्धतीने सुरू आहे. काल पहिल्या दिवशी उद्घाटन शिबिरानंतर नंतर संजय टिकारिया यांच्या, “चला आपण प्रयोग करूया” दुपारी डॉ. जी. बी. कुलकर्णी यांचे”वनस्पती शास्त्र- प्रयोग व आकलन” आणि सायंकाळी डॉ.श्रीनिवास औंधकर यांचे “सूर्यमाला व अंतराळाची सफर” या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आज दिनांक 28 रोजी ,जीवनामध्ये बदल ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे, बदलांवरच सर्व आयुष्य अवलंबून असतं असं सांगत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा आधार घेऊन काही महत्त्वाचे सल्ले दिले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com