जालना -जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जालना जिल्हा परिषदेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी आपल्या परिवारासह वृक्षारोपण केले
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील स्वयंस्फूर्तीने हे वृक्षारोपण केले आहे. विशेष म्हणजे झाड लावण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खिशातले पैसे दिले असल्यामुळे भविष्यामध्ये ही झाडे जगतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान ही झाडे सुशोभीकरणाची असल्यामुळे जालना जिल्हा परिषदेचा परिसर या सुंदर आकर्षक फुलझाडांमुळे फुलून दिसेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी व्यक्त केला आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com