जालना- दुचाकी वरून प्रवास करत असताना केवळ शिरस्त्रान म्हणजेच हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या अपघातात सन 2022 -23 मध्ये तब्बल 7700 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. त्यामुळे सरकार आता खडबडून जागे झाले आहे, आणि याची अंमलबजावणी स्वतःच्या म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यापासून सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 16 आणि 17 असे दोन दिवस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये उभे राहून हेल्मेटची जनजागृती केलिआणी त्याचे फायदे तोटे नागरिकांना समजावून सांगितले आहेत, आणिआता सोमवारपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.

जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय ,जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय या चार ठिकाणी या अधिकाऱ्यांनी काल आणि आज कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवून दिले आणि ते समजावून सांगितले.काल दिनांक 15 रोजी जिल्हा परिषदेमध्ये हेल्मेट घालून येणाऱ्यांची संख्या 16, न्यायालयात दोन, तहसीलमध्ये एक आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सहा अशी होती. एकूण हेल्मेट घालून येणाऱ्यांची संख्या 25, तर हेल्मेट शिवाय येणाऱ्यांची संख्या ही अनुक्रमे 110, 80,37आणि 51अशी एकूण 278 होती.

हेल्मेट घालून येणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे तर एका दिवसाच्या जनजागृतीमुळे हेल्मेट न घालून येणाऱ्यांची संख्या घटली आहे. आज दिनांक 16 रोजी हेल्मेट घालून येणाऱ्यांची जिल्हा परिषदेत संख्या 42 ,न्यायालयात 55 ,तहसील मध्ये 14, आणि जिल्हाधिकारी कार्यालयात 31 अशी एकूण 142 झाली आहे. कालच्या तुलनेत ही संख्या पाच पटीने वाढली आहे. हेल्मेट न घालून येणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांची गुनानुक्रमे ही संख्या 68,22,16,36अशी एकूण 142 एवढी आहे. म्हणजेच 50% ही संख्या घटली आहे. त्यामुळे निश्चितच नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. केवळ दंड वसूल करणे हा याचा उद्देश नसून दुचाकीस्वारांनी सुरक्षित प्रवास करावा असा आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सोमवार पासून सक्ती
दोन दिवसांच्या जनजागृती नंतर शनिवार रविवार कार्यालयांना सुट्टी आहे मात्र शनिवारपासून हेल्मेटची सक्ती केल्या जाणार आहे. मोटार परिवहन कायदा कलम 129 अन्वये सार्वजनिक ठिकाणी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन केल्यास कलम 194(ड) नुसार 1000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित होऊ शकतो.हे आहेत या मोहिमेतील अधिकारी
मोटार परिवहन निरीक्षक सचिन झाडबुके, हनुमंत सुळे, उदय साळुंखे, नितीन पाटील. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल राठोड,प्रणव चव्हाण,अभिजीत रिळे,ओंकार कातारे,शरद तरटे,राजकुमार मुंडे,अच्युत भातलोंढे,प्रवीण केदार.

अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com दिलीप पोहनेरकर 942221972

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version