जालना- पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच जालना शहरात डेंग्यूने शिरकाव केला आहे. सर्वे नंबर 488 म्हणजेच शासकीय कार्यालयांच्या पाठीमागे असलेल्या सटवाई तांडा येथे या आजाराची लक्षणे असलेले रुग्ण निष्पन्न झाले आहेत आणि एक महिलाही दगावली आहे. दरम्यान या ठिकाणी जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने काल दिनांक चार पासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि यासंदर्भात संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर बळीराम बागल आणि हिवताप कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी आज जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी पाऊस मात्र पडला नाही अशा परिस्थितीत देखील सटवाई तांडा मध्ये असलेल्या सुमारे सव्वाशे घरांच्या परिसरात डेंग्यूची लागण झाली आहे .खाजगी रुग्णालयांमध्ये तपासणी केली असता त्यांचे अहवाल देखील डेंग्यू असल्याचे आले आहेत आणि याचमुळे एका खाजगी रुग्णालयात महिलेचा देखील मृत्यू झाला आहे .परंतु शासन दरबारी जोपर्यंत हे नमुने डेंग्यु लागण झाल्याचे निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत शासन डेंग्यूची लागण झाली आहे असे समजत नाही. तूर्तास उपाययोजना म्हणून जिल्हा हिवताप कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून या भागामध्ये जनजागृती सुरू केले आहे आणि घरामध्ये साचलेलं पाणी, सांडपाणी हे  निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच या भागांमध्ये डॉ. बागल यांनी नागरिकांना उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले आहे.  हॉस्पिटलच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून या भागात फवारणी ही सुरू केले आहे.

ताज्या बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version