परतुर- परभणी जिल्ह्यात असलेल्या सेलू येथील दोन तरुणांचा परतुर तालुक्यात असलेल्या केदार वाकडी येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवार दिनांक 9 रोजी दुपारी घडली.

सेलू येथे गायत्री नगरात राहणारे रोहीत दिपक टाक वय 23 वर्षे आणि नितीन गुणाजी साळवे वय 25 वर्षे हे दोघे आज दुपारी केदार वाकडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेले होते. ते बुडत असताना या तळ्यात मच्छीमारी करणाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून या दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी तळ ठोकून आहेत.

ताज्या बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version