जालना -योगशिक्षिका संगीता लाहोटी यांच्या खून खटल्याची सुनावणी आज दिनांक 11 रोजी दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होती. या प्रकरणातील फिर्यादी हर्षवर्धन लाहोटी यांची सुरुवातीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडल्यानंतर आरोपी भीमराव धांडे यांची उलट तपासणी आरोपीचे वकील अनिरुद्ध घुले पाटील यांनी केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे.

यासंबंधीच्या मागील बातम्या पहाण्यासाठी डाउनलोड करा Edtv Jalna हे App

श्री. घुले यांनी केलेल्या उलट तपासणीमध्ये तक्रारदार हर्षवर्धन लाहोटी यांनी सांगितले की, “त्यांचा व्यवसाय पोलिसांचे गणवेश तयार करून विकणे हा आहे. दिनांक 14 डिसेंबर च्या सकाळी साडेआठ वाजता श्री.अलोक यांचा फोन आला त्यावेळी मी झोपलेलो होतो आणि अंगावर असलेल्या कपड्यासह लगेच दोन ते तीन मिनिटांमध्ये काकांच्या घरी पोहोचलो. भीमराव धांडे हे गेल्या 40 वर्षांपासून काकांकडे कामाला आहेत आणि ते विश्वासू म्हणून समजल्या जात होते. काकांच्या घरी दोन मजल्यांच्या मध्ये एक गुप्त खोली आहे आणि ती सहजासहजी बाहेरून दिसत नाही. या घराला ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवत होते त्यावेळेस मी समोर होतो. बंगल्यामध्ये असलेल्या व्यायाम करण्याच्या खोलीला मुख्य दाराव्यतिरिक्त बाहेर पडण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. बंगल्यामध्ये असलेल्या दारांना लॉन्च पद्धतीचे कुलूप आहेत जे दार ओढून घेतल्यानंतर लागतात आणि  बाहेरून उघडायचे असतील तर चावी शिवाय उघडता येत नाहीत .तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर जखमी अवस्थेत दवाखान्यात न जाता घरी गेलो काकांचा मोबाईल आरोपीकडे होता आणि पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तो मोबाईल परत मागितल्यानंतर आरोपीने तो मोबाईल फोडला. दरम्यान आरोपींच्या वतीने उलट तपासणी करताना ऍड. घुले यांनी हर्षवर्धन लाहोटी यांना, ज्यावेळी संगीता लाहोटी रक्ताच्या थारोळ्यात होत्या त्यावेळेस त्यांची नाडी किंवा श्वास चालू आहे का नाही हे पाहण्याचा प्रयत्न का केला नाही ? असा प्रश्न केला .या प्रश्नाचे उत्तर देताना श्री .लाहोटी म्हणाले की तिथे उभ्या असलेल्या पोलिसांनी मृतदेहाला हात लावू नका म्हणून सांगितले त्यामुळे आम्ही तो प्रयत्न केला नाही आणि पोलिसांनी पंचनामा केल्यानंतरच घटनास्थळावरून मृतदेह हलवला. दरम्यानच्या काळात जेवणाच्या खोलीमध्ये आरोपी आणि संगीता लाहोटी यांच्यामध्ये झटापट झाल्याच्या खुणा देखील पहायला मिळाल्याचे श्री लाहोटी यांनी सांगितले. त्यासोबत पोस्ट ऑफिस समोरील हा रस्ता वर्दळीचा आहे परंतु कार्यालयीन वेळेतच तिथे वर्दळ असल्याचेही ते म्हणाले .या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दिनांक 21 22 आणि 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.

ताज्या बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version