जालना -भारतीय प्रशासन सेवा म्हणजेच आयएएस ही परीक्षा पास होऊन प्रशासन सेवेत आलेल्या मीना दांपत्याने कसा अभ्यास केला? कसे पास झाले? कसे ध्येय गाठले? आणि हे ध्येय गाठण्यासाठी काय करावे लागते. या सर्व गोष्टींचा खजिना विद्यार्थ्यांसाठी खुला करून दिला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या व प्राथमिक विभागाच्या वतीने “करिअर गायडन्स” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विकास मीना यांची पत्नी वर्षा मीना या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या दोघांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, हे सविस्तर सांगत असतानाच विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे मुद्देही विकास मीना यांनी सांगितले आहेत. त्यामध्ये दररोज किमान 15 तास अभ्यास, स्वयंअध्ययनावर म्हणजेच सेल्फ स्टडी वर फोकस, आणि किमान एका वेळेस तीन तासांची बैठक. या तीन गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच अनेक विद्यार्थी आपण हार्ड वर्क करतो असे समजतात आणि सहा सहा तास युट्युब वरील कोचिंग चे व्हिडिओ पाहतात परंतु ते हार्डवर्क नाही. असे सांगून हार्ड वर्क म्हणजे काय ?अभ्यास कसा करावा? यश कसे मिळवावे यासोबतच स्वतः आणि त्यांची पत्नी वर्षा मीना यांच्या विषयी देखील अभ्यासाच्या पद्धती मधील अनेक गुपिते खुली के आहेत हे सर्व मार्गदर्शन सोबत दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल या मार्गदर्शन कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दात खेळ महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांच्यासह शिक्षण विभागातील अन्य काही अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version