जालना- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी शनिवारीच पदभार घेतला आहे आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांकडून स्वागत स्वीकारत ,आलेल्या अभ्यागतांची निवेदनही त्यांनी स्वीकारली आणि त्याच्या योग्य सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या स्वागतोच्छुकांमध्ये महिला अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ ,जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा नियोजन व विकास अधिकारी श्री. सुरवंशी यांच्यासह राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉ. पांचाळ यांचे स्वागत केले. त्याचवेळी ज्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्याचा कारभार हाकला जातो तिथे वरिष्ठ पदावर बसलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर-पालवे, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी संगीता सानप, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, या तिघीही महिला अधिकारी आहेत. अशीच परिस्थिती मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची आहे. वरिष्ठ पदावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा मीना या जरी बसलेल्या असल्या तरी त्यांना सहकार्य करण्यासाठी असलेल्या वरिष्ठ अधिकारी म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मंजुषा राजहंस, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. जयश्री भुसारे, महिला व बाल प्रकल्प विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे- चाटे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता विद्या कानडे या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनीच आज नूतन जिल्हाधिकारी डॉ पांचाळ यांची भेट घेऊन स्वागत केले.त्यामुळे जिल्ह्याची भागदोड जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असो अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या  असो महत्त्वाच्या खुर्च्यांमध्ये महिला अधिकारीच बसलेल्या असल्या आहेत.

सविस्तर बातम्या पाहण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version