जालना-दि.27 प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथील जिल्हा शाखा असलेल्या जालना जिल्ह्याच्या प्रमुख राजयोगिनी सुलभा दीदी यांचे वयाच्या 70 व्या वर्षी बुधवार दिनांक 26 रोजी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 27 रोजी दुपारी एक वाजता राजयोग, भवन मंठा चौफुली येथून निघणार आहे. तत्पूर्वी सकाळी दहा ते एक दरम्यान त्यांचा मृतदेह अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मूळच्या भुसावळ येथील उच्चशिक्षित सुलभा जोशी यांनी पन्नास वर्षांपूर्वी परिवाराचा त्याग करून सेवा,तपस्या, अध्यात्म या क्षेत्रात पदार्पण केले आणि ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाशी एकरूप झाल्या. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या या केंद्रात मागील 40 वर्षांपासून त्या कार्यरत होत्या .मधुर वाणी आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सेवावृत्ती या त्यांच्या सदगुणांमुळे त्यांनी अनेकांच्या जीवनात परिवर्तन करून सन्मार्ग दाखवला. 146 देशांमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे कार्य सुरू आहे आणि त्या अंतर्गत 47 हजार बहिणी समर्पित सेवाभावाने जीवन जगत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये देखील जिल्ह्याला प्रमुख केंद्र असून अंबड, परतूर, मंठा, आदि तालुक्यात या केंद्राच्या उपशाखा आहेत .मागील तीन-चार वर्षांपासून सुलभा दीदी या आजारी होत्या.

Dilip Pohnerkar-9422219172
Edtv Jalna News, App on play store,You Tube &
www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version