हिंगोली- भारतीय जनता युवा मोर्चाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हल्लेखोर दिसत आहेत.

एक गोळी पप्पू चव्हाण यांना लागली आहे. अशा जखमी अवस्थेत पप्पू चव्हाण हे स्वतः एका खाजगी रुग्णालयात गेले आणि तेथून पुढे त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे .काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून आपले काम आटोपल्यानंतर पप्पू चव्हाण हे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आले आणि आपल्या वाहनात बसत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर गोळा झाडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे आणि पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यातही घेतले आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna. com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version