जालना- जालना शहराच्या कदीम जालना पोलीस ठाणे अंतर्गत विविध विभागात राहणारे तीन शालेय मित्र विचार विनिमय करून शहरातून गायब झाले आहेत. पालकांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदविली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
यासंदर्भात प्रकाश जाधव व 47 वर्ष राहणार सिंचन वसाहत जुना जालना यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी माझी पत्नी लक्ष्मी जाधव व दोन मुले मोठा मुलगा मयूर व लहान मुलगा अंकित जाधव वय पंधरा वर्षे असे आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. मी पाटबंधारे विभाग जालना येथे नोकरी करतो. दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास झेंडावंदन असल्याने मी सकाळी लवकर उठून झेंडावंदनाला जाण्यासाठी तयारी करत होतो. तेव्हा माझा मुलगा अंकित हा झोपलेला होता, तेव्हा अंकित चे मित्र स्वराज संतोष मापारी व 14 वर्षे, राहणार घायाळ नगर जुना जालना व हर्षद अशोक देवकर व 14 वर्षे ,राहणार कसबा गांधी चमन जुना जालना असे दोघे आमच्या घराच्या बाहेर आले व अंकितला आवाज दिला. म्हणून मी अंकित यास झोपेतून उठविले व सांगितले की तुझे मित्र बाहेर आलेले आहे तुला आवाज देत आहे. त्यानंतर अंकित हा झोपेतून उठून बाहेर आला व बाहेर मित्रांना भेटून परत घरात आला व म्हणाला की मला आंघोळ करायची आहे ,असे म्हणून आंघोळीसाठी गेला त्यानंतर मी व माझी पत्नी आम्ही दोघे झेंडावंदनासाठी पाटबंधारे विभाग जालना येथे निघून गेलो व मोठा मुलगा मयूर घरात झोपलेला होता. त्यानंतर झेंडावंदन संपल्यावर माझी पत्नी घरी आली व मी तेथेच ऑफिसला थांबलो. त्यानंतर पत्नीला फोन करून स्कुटीच्या डिक्की मध्ये माझे हेडफोन आहेत ते माझ्या मित्राला द्या असे सांगितले असता, माझी पत्नी मला म्हणाली की स्कुटी घराबाहेर नाही .असे सांगितल्याने मी लगेच घरी परत आलो व घरात अंकित चा शोध घेत असताना मला दरवाज्याच्या हँडल मध्ये एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठी मध्ये अंकितने लिहिले होते की” मम्मी पप्पा आणि मयूर तुम्ही हे लेटर वाचेपर्यंत वेळ गेलेली असेल, मी एवढा मोठा नाही झालो की मी असे डिसिजन घ्यावे, मी घर सोडून जात आहे मला शोधण्याचा प्रयत्न करू नका” वगैरे ….असे लिहिलेले होते त्यानंतर मी अंकितला भेटण्यासाठी आलेले मित्र स्वराज याचे वडील संतोष मापारी राहणार घायाळ नगर व हर्षद याचे वडील अशोक देवकर राहणार कसबा जुना जालना यांना फोन द्वारे संपर्क करून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की स्वराज व हर्षद असे दोघे ट्युशनला जातो असे सांगून घरातून निघून गेले आहेत .म्हणून आम्हाला खात्री झाली की अंकित स्वराज व हर्षद यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी अज्ञात कारणासाठी पळून नेले असावे. मुलगा अंकित याने आमची होंडा एक्टिवा कंपनीची स्कुटी कंपनी क्रमांक एम एच 21 ए वाय १२ ३८ ही घेऊन गेला आहे .मुले अंकित स्वराज व हर्षद यांचे वर्णन पुढील प्रमाणे
1अंकित प्रकाश जाधव वय पंधरा वर्षे राहणार सिंचन वसाहत ईदगाह मैदानाच्या मागे जुना जालना ,उंची पाच फूट रंग सावळा डोक्याचे केस बारीक, बांधा सड पातळ अंगात चॉकलेटी रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचे स्वेटर ,पायात काळा रंगाचे शाळेचे बूट 2) स्वराज संतोष मापारी व 14 वर्षे राहणार घायाळ नगर उंची पाच फूट डोक्याचे केस बारीक अंगात चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, पायात निळ्या रंगाची चप्पल सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल सिम नसलेला व दोन हजार रुपये रोख रक्कम .3)हर्षद अशोक देवकर वय 14 वर्षे राहणार कसबा गांधी चमन जुना जालना डोक्याचे केस बारीक अंगात चॉकलेटी रंगाची पॅन्ट व शर्ट पायात काळा रंगाचे शाळेचे बूट सोबत एचपी कंपनीचा लॅपटॉप व तीन हजार रुपये रोख रक्कम.
प्राप्त माहितीनुसार स्वराज संतोष मापारी याचे स्नॅपचॅट अकाउंट आहे आणि या अकाउंट वर त्याने मी जिथे आहे तिथे ठीक आहे आणि सक्सेस झाल्यावर येईल असा मेसेज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून 49 मिनिटांनी ठेवल्याचे दिसत आहे. ही मुले कोणाला दिसल्यास कदीम जालना पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172