जालना- शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्तीसाठी तीन तास अभ्यास पुरेसा आहे, मात्र तो मनातून करा असा सल्ला अमोघ काबरा यांनी दिला आहे.
येथील गोल्डन जुबली शाळेचा आठवीतील विद्यार्थी अमोघ अमित काबरा याने 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ ,पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची उपस्थिती होती.अमोघ हा शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अमित काबरा यांचा मुलगा आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172