अंबड- फक्त आपलेच वरिष्ठ नव्हे तर आपल्या वरिष्ठांचे वरिष्ठ आणि त्यांचेही वरिष्ठ म्हणजे छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त मनोज लोहिया हे जालना जिल्ह्यामध्ये असताना पोलीस उपनिरीक्षकाने तीस हजारांची लाच घेऊन आपली हिम्मत दाखवून दिली आहे.
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश हरी चव्हाण व 39 वर्ष वर्ग दोन यांच्याकडे जामखेड हे बीट आहे या बीट अंतर्गत निहालसिंग वाडी येथे गट क्रमांक 718 मध्ये या प्रकरणातील तक्रारदाराची शेती आहे सदरील ठिकाणची पाच एकर 29 गुंठे जमीन तक्रारदाराने शेतकरी हरणे यांना पाच लाख रुपये घेऊन विकली आहे आणि इसार पावती करून दिली आहे. या व्यवहारानंतर या शेती संदर्भात काही वाद उद्भवले आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आला. या तक्रार अर्जाची चौकशी करून या प्रकरणातील तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाच्या मित्रामार्फत यापूर्वीच दहा हजार रुपये स्वीकारले. आणि चाळीस हजार रुपयांची पंचा समक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले .त्या अनुषंगाने पुढील व्यवहार आज दिनांक 23 रोजी जामखेड पोलीस चौकीमध्ये झाला. तडजोडी अंती 40 हजारांपैकी तीस हजार रुपयांची लाच घेताना अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश हरी चव्हाण यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172