जालना-मागील तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, मूग ,उडीद आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. मोसंबी पिकाचीही गळती झाली आहे, या आणि अन्य काही शेतीच्या नुकसानी संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी आठ मागण्या शासनाकडे केल्या आहेत.या मागण्यांमध्ये सन 2023 यावर्षी खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख 12 हजार 998 शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून घेतलेले 1000 कोटी पेक्षा अधिक रकमेची पीक कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे.शेतकऱ्यांना या गंभीर परिस्थितीत आधार देण्यासाठी प्रति हेक्टरी किमान 25000 व फळबागांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी जेणेकरून शेतकरी वर्ग आत्महत्या कडे वळणार नाही ,शासन धोरणाप्रमाणे 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक कंपन्यांनी शेतकऱ्यांना 25% आगरीम रक्कम देणे आवश्यक आहे .प्रत्यक्षात 75 पेक्षा अधिक दिवसांचा मोठा खंड पडल्याने सदरील रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्याच्या सूचना विमा कंपनींना द्याव्यात. भविष्यात निर्माण होणाऱ्या भीषण पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने आत्ताच योग्य ते सर्व नियोजन करण्यात यावे. पाच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचे थकीत अनुदान शासनाने शेतकऱ्यांना द्यावे.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांचे अनुदान तात्काळ देण्यात यावे .दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांकडे बँक विज बिल आदिवासी थांबविण्यात याव्यात आठ ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांच्या हाताला.मिळावे त्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हरिहर शिंदे, माजी नगरसेविका गंगुबाई वानखेडे, यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
edtv jalna news App on play store, web-edtvjalna.com you tube-edtvjalna Dilip Pohnerkar-9422219172
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com